पदवीधर मतदारांनी शंकरपूर डोमा जिल्हा परिषद क्षेत्रात 67 टक्के केले मतदान
शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
शंकरपूर : - नागपूर पदवीधर संघ निवडणूक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शंकरपूर बूथ क्रमांक २११ इथे मतदान पार पाडण्यात आली असून सोशल डिस्टन्स मध्ये मतदान करण्यात आले.
एकूण मतदार ४१८ पैकी ३२९ पुरुष,८९ स्त्री आहेत यापैकी २८१ मतदारानी मते टाकलेली आहे.
सुशिक्षित पदवीधर मतदार राहिले मतदानापासून वंचित
शंकरपूर डोमा जिल्हा परिषद क्षेत्रात सुशिक्षित पदवीधर मतदारांनी फार्म न भरल्याने ते मात्र या मतदानापासून वंचित राहिले आहे या निवडणुकीसाठी पोलिस विभागाकडून परिपूर्ण दक्षता घेण्यात आली होती व बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बूथ परिसरातील १०० मीटर अंतरातील मोबाईल शॉपी, भाजीपाला, कटिंग दुकान, हार्डवेअर, कपडे दुकान,नाश्ता, चाय,पान सेंटर, आदी सर्व दुकाने सकाळ पासूनच ते सायंकाळी पाच वाजले पर्यंत बंद होती याकरिता विशेष खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, पोलिस विभागाकडून दक्षता घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!