बोपापुर शेतशिवारात दारुमालावर पोलिसांची धाड

13 लाख 40000 हजार मुद्देमाल जप्त

दोन आरोपींना अटक

तालुका - प्रतिनिधी (आलेख रट्टे)

वरोरा : - वरोरा तालुक्यातील खांबड्याजवलील बोपापुर शेत शिवारात दारुमाल असल्याच्या खबरीवरून पोलिसांनी धाड मारली तेव्हा या कार्यवाहीत 122  नग खर्ड्याचे खोक्यात प्रत्येकी 90 एम.एल.देशी दारूने भरलेल्या कंपनी सीलबंद एकूण14200 नग निपा की.12,20,000, एक विवो कंपनी मोबाईल की.10000, एक ओपो कंपनीचा मोबाइल की.10000, एक बजाज पल्सर की.60000, एक पॅशन गाडी की.40000, असा एकूण 13 लाख 40000 हजाराचा माल जप्त करण्यात आला.
 पोलीस स्टेशन वरोरा अपराध क्र.1057/20 कलम( 65)ई( अ),83 मदाका अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी शेखर सांबय्या जंगोनी वय 45,शेख रिजवान शेख रसूल दोन्ही रा.खांबाडा यांना अटक करण्यात आली आहे.
  सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक साळवे,अप्पर पोलीस अधीक्षक खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकीरण मडावी,सपोनि किटे,सपोनि चवरे,पोलीस उपनिरीक्षक बेलसरे,नापोका दीपक दुधे,यांनी कार्यवाही केली.

   अवैध  ठोक दारू विक्री करणाऱ्या मोरक्यांच्या मुसक्या केव्हा आवळणार

   शहरी व ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे.ठोक दारू विक्रेते नेमके कोणत्या मार्गानी आणि कुठून दारू आणतात हे मार्ग तर शोधण्याचे कर्तव्य पोलीस विभागाचे आहे.परंतु,शहर किंवा ग्रामीण भागात दारू पोहचल्यानंतर आणि खबर मिळाल्यानंतरच नेमकी पोलिसांची त्या दारुमालावर धाड पडून कार्यवाही होते.आरोपी हे बहुधा ठोक दारू विक्रीदारांचे रोजंदार असतात जमानतीवर सुटले जातात.परंतु, ठोक दारू पुरविणारे नेमके मोठे मासे व म्होरके  मात्र मोकळे असतात .त्यांना जेरबंद का केले जात नाही.असा प्रश्न समाजातील सूज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे. म्होरक्याना  जेरबंद करून त्यांच्या कायमच्या मुसक्या आवळणार तरी कधी?अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!