पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार संदीप दिवाकर जोशी यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा

पदवीधर मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार संदीप दिवाकर जोशी यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा


ब्रम्हपुरी:- येत्या 1 डिसेंम्बर रोजी पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवणुकी करिता भारतीय जनता पार्टी कडून नागपूर चे महापौर श्री. संदीप जोशी याना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांचा प्रचार दौरा चंद्रपूर जिल्ह्यात चालू आहे आज दिनांक १८ रोजी ब्रम्हपुरी येथील विठ्ठल रुख्मिनी सभागृहात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहचून भाजपच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन संदीप जोशी यांनी केले.

या वेळी खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, माजी आमदार प्रा.अतुलजी देशकर,माजी जिल्हाध्यक्ष हरीषजी शर्मा,जिल्हा संघटन महामंत्री संजयजी गजपुरे,जिल्हा महामंत्री कृष्णाजी सहारे, महामंत्री नामदेवजी डाहुले, चंद्रपूर जिल्ह्याचे भाजयुमो अध्यक्ष आशिष देवतळे आधी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना संदीप जोशी म्हणाले जेव्हा पासून पदवीधर मतदारसंघाची निर्मिती झाली, तेव्हापासून या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असून हा बालेकिल्ला आपण कायम ठेवला आहे.

सर्वात मोठा पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदार संघाची ओळ्ख असल्याने कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागून याहीवर्षी हा बालेकिल्ला भाजपकडे कायम राहील.यासाठी प्रयत्न करावे असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक तथा भाजपा शहर महामंत्री मनोज वठे यांनी केले तथा आभार प्रदर्शन शहर महामंत्री मनोज भूपाल यांनी केले. या मेळाव्याला भाजप कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!