बल्लारपूरात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

बल्लारपूरात प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 
    बल्लारपुर    :(
वसंत मून)   
बल्लारपूर शहरात भारताची पूर्व प्रधानमंत्री प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते माजी खासदार व कामगार नेते श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पेपरमिल मजदूर सभा, युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय आणि विदर्भ किसान मजदूर काँग्रेस बल्लारपूर च्या संयुक्त माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत बल्लारपूर पेपरमिलच्या सर्व कंत्राटी कामगारांना फेसमॉस्क चे वाटप करण्यात आले त्यानंतर बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौक येथे सामान्य नागरिकांना सुध्दा फेसमॉस्क चे वाटप करण्यात आले तदनंतर दुपारी 12:30 वाजता मातोश्री वृद्धाश्रम, भिवकुंड नाला, विसापूर येथे जावून येथील वृद्धांना भोजनदान देण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात तारासिंग कलसी, रामदास वागदरकर, विरेंद्र आर्य, चेतन गेडाम, गजानन दिवसे, कृष्णन नायर, शंकर महाकाली,सुदर्शन पुल्ली, सुभाष शर्मा, अजय रेड्डी, राजेन्द्र शुक्ला , राजेन्द्र गहलोत, सिकंदर ख़ान, संदीप नक्षिणे,दानिश शेख, शैलेश लांजेवार, काशी मेगनवॉर,जॉन कंकूटला, चंचल मून, विक्की गुजारकर, राहुल ननकटे, प्रेम तारला, जुनैद सिद्दीकी, गौतम आमटे, रोशन ढेगडे ई नी अथक परिश्रम घेऊन  सदर कार्यक्रम यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!