महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) ची नूतन कार्यकारिणी घोषित जिल्हा अध्यक्षपदी मोरेश्वर गौरकार यांची निवड

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) ची नूतन कार्यकारिणी घोषित  
जिल्हा अध्यक्षपदी मोरेश्वर गौरकार यांची निवड

सिंदेवाही :( निकेश वेटे) 
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ दिल्ली संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) जिल्हा शाखा  चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी सिंदेवाही येथील मोरेश्वर गौरकार यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यवाह पदी अमोल देठे चंद्रपूर यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणी चंद्रपुरच्या निवडीबाबत आँनलाईन बैठक गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २० रोजी संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर होते.
परिषद ही एक विशिष्ट ध्येयांनी  प्रेरित असून चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या/मागण्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे  त्यांनी म्हटले आहे.
जिल्हा शाखेच्या बैठकीत पुढील तीन वर्षांकरिता (२०२०-२३ ) राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
अध्यक्ष- मोरेश्वर गौरकार, कार्याध्यक्ष-संजय लांडे, कोषाध्यक्ष-अजय बेदरे, कार्यवाह-अमोल देठे,संगठन मंत्री-सुशांत मुनगंटीवार, उपाध्यक्ष-मधुसुदन रेड्डी, संतोष जिरकुंटवार.
कार्यालयीन मंत्री-सुंदर धांडे
महीला आघाडी प्रमुख-विजयालक्ष्मी पुरेड्डीवार, सहप्रमुख-योगिनी दिघोरे, सल्लागार-अश्विनी ताटीपामूलवार, प्रसिद्धी प्रमुख-सुनिल टोंगे, संपर्क प्रमुख-राजेंद्र पांडे
सभेचे सुत्रसंचलन अजय बेदरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सतीश दुवावार यांनी मानले.
आँनलाईन बैठकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक )
चे सभासद  यांनी सहभाग नोंदविला.
नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीने जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) श्री दीपेंद्र लोखंडे  यांची भेट घेऊन संघटनात्मक निवेदन सादर केले. यावेळी मोरेश्वर गौरकार,अजय बेदरे, सुशांत मुनगंटीवार, सुंदर धांडे, सतीश दुवावार, प्रविण धगडी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!