कोलाम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा- रजनी शर्मा

 
कोलाम पाड्यावर अध्यापक संघाचे प्रांताध्यक्ष लांडगे यांचा वाढदिवस साजरा

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघ, तालुका राजुरा शाखेतर्फे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजयकुमार लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून खडकी -रायपुर, तालुका जीवती येथील आदिवासी कोलाम कुटुंबातील सदस्यांना धान्य कीट ,कपड़े व खाऊ चे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्षा रजनी शर्मा, पूर्वा देशमुख, कृतीका सोनटक्के, एड़.मेघा धोटे, बादल बेले, विजय जांभूळकर, संतोष देरकर, संदीप आदे, सूनयना तांबेकर, मनोज तेलीवार,आशीष करमरकर, एड़. दीपक चटप , सुनीता कुंभारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
              यावेळी रजनी शर्मा यांनी महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघाची कार्यपद्धती यावर प्रकाश टाकत या संघातर्फे अनेक सामाजिक ,शैक्षणिक उपक्रम राबविल्या जात असल्याची माहिती दिली. कोलाम समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून शर्मा यांनी पाथ फाऊंडेशन करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. कृतीका सोनटक्के व पूर्वा देशमुख यांनी आदिवासी कोलाम बांधवांच्या सोबत आपण राज्य अध्यक्ष विजयकुमार लांडगे यांचा वाढदिवस साजरा करतांना आनंद होत असल्याचे म्हटले. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आपल्या संघाची महत्वपूर्ण भूमिका बजावत त्यांची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणार  असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पूर्वा देशमुख व आभार प्रदर्शन कृतीका सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघ, शाखा राजुरा तालुकाच्या  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!