शेतात करंट लागून शेतकरी चा मृत्यू
शेतात करंट लागून शेतकरी चा मृत्यू
चंद्रपुर : मोहम्मद सुलेमान बेग
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा परिसरातील गोजोली येथे शेतात करंट लावत असतांना शेतकरी जागीच ठार झाल्याची बातमी उघडकीस आली मृतकांचे नाव साईनाथ दाऊ मेश्राम वय 42 होतें.
सध्या सर्वत्र धान कापणी सुरू आहे अशा वेळेस वन्यप्राण्यांमुळे नुकसान होऊ नये म्हणून दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी रानटी डुकराच्या संरक्षणासाठी विधुत पोल वरून शेतीच्या सभोवताल विधुत तार लावत असतांना करंट लागून जागेच साईनाथ मेश्राम ठार झाले.
सदर मृत इसमाच्या परिवारात आई ,वडील, पत्नी व दोन मुले होते. या घटनेमुळे गोजोली गावात सर्वत्र शोकांत पसरलेला आहे. घटने माहिती धाबा पोलिसांना होतांच तपास सुरू केलेले आहे.
ताडोबा बफर क्षेत्राच्या गावांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात सौर ऊर्जा कुंपण देण्यात यावे म्हणून बरेच वन्यजीव प्रेमीनी मागणी केली होती व तसेच इको प्रो ने सुद्धा वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत या गंभीर विषयांवर ताडोबाच्या वन अधिकाऱ्यांनी विचार करावे जेणे करून पुन्हा कोणी बळी होता कामा नये.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!