स्टेरिंग तुटल्याने रोड च्या कडेला असलेल्या शेतामध्ये उतरली ट्रॅव्हल्स.
सावली:(प्रतिनिधी)
मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 29 नोव्हेंबर ला चंद्रपूर-मुल मार्गाने 1:30 वाजताच्या सुमारास गडचिरोली प्रवासी घेऊन जात असणारी ट्रॅव्हल्सचा अचानक स्टेरिंग तुटल्याने चिमदा गावा जवळ रोड च्या कडेला असलेल्या शेतामध्ये उतरली. या ट्रॅव्हल्समध्ये अंदाजे 40 प्रवासी होते. काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. मोठी दुर्घटना टळली. पण यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण ट्रॅव्हल चे नुसकान झाले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले, असून पुढील तपास पोलिस करीत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!