करकोचा पक्ष्याला पर्यावरण संवर्धन समिती कडुन मिळाले जीवनदान

आजारी  पक्ष्याला  वनविभागाकडे  सुपुर्द   

पळसगाव : - पक्षी पर्यावरणाचा मौल्यवान घटक आहे.पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे . पक्षी आता मात्र दिसेनासे होत आहे. पक्ष्यांची शिकार, अपघात, वातावरण बदल, वृक्ष तोड,वनवा आदी कारणाने पक्ष्यांचा निवारा हरवला आहे.चिमुर तालुक्यातील नेरी येथील शेतकऱ्यांच्या शेतात करकोचा पक्षी आजारी अवस्थेत शुभंम पिसे व तुशांत पिसे यांना पडुन दिसला. दोघांनीही वेळ न लावता पक्षी प्रेमी कवडू लोहकरे यांच्या शी संपर्क केला. नेरी येथील वनविभागामध्ये रात्रीच्या वेळेस कोणीच नसल्याने चिमुर वनविभागामध्ये आजारी पक्ष्याला आणण्यात आले. पक्षी काहीच खाल्ले नसल्याने पुर्णत:  कमजोर पडला होता.पक्ष्याला  उडता ये़इना पक्षी प्रेमी कवडू लोहकरे यांनी पक्ष्यांसाठी खाद्य म्हणुन मासे  व पाणी देण्यात आले.  व वनविभागाकडे सुपुर्द  करण्यात आले.यावेळी पक्षी प्रेमी कवडू लोहकरे, शुभंम पिसे, तुशांत पिसे  व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 


"" नेरी परीसरात तलावावर जाळे टाकून पक्ष्यांशी शिकार करण्याची टोळी सक्रिय आहे. करकोचा, बगळा इतर पक्षी संकटात सापडले आहे. शिकार करणा-या शिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी""

कवडू लोहकरे 
पक्षी मित्र चिमुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!