सोंडो येथील युवकांनी साजरी केली महात्मा फुले पुण्यतिथी
सोंडो:(प्रतिनिधी)
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक माळी समाज मंडळ सोंडो यांच्यातर्फे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.यासाठी गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून स्वच्छता जनजागृती केली.
त्याचबरोबर सायंकाळी ठीक ६ वाजता सत्यशोधक माळी समाज तर्फे महात्मा जोतिबा फुले स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील लोक उपस्थित राहून सहकार्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सत्यशोधक माळी समाजाचे उपाध्यक्ष जयचंद्र शेंडे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक ऋषिजी गेडाम आणि चंद्रशेखर मालखेडे यांनी आपले आपले मत व्यक्त करून लोकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सत्यशोधक माळी समाजाचे उपाध्यक्ष जयचंद्र शेंडे यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी, गावात तरुण मित्राच्या सहकार्याने पाटी लावल्या आणि लोकांमध्ये ओबीसींबद्दल जागृती केली.
त्यांना त्यांचा सविधानिक हक्क अधिकार मिळाला पाहिजे यासाठी पाटी लावा मोहीम गावामध्ये राबविली. यासाठी गावातील लोकांनी उस्पूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयचंद्र शेंडे यांनी केले. शेवटी महात्मा फुले यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार गौरव मोहुर्ले यांनी मानले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!