बल्लारपूर दर्गा परिसरात अपघात 1 गंभीर जखमी : उपचारार्थ चंद्रपूर मेडिकलमध्ये भर्ती

बल्लारपूर दर्गा परिसरात अपघात 1 गंभीर जखमी : उपचारार्थ चंद्रपूर मेडिकलमध्ये भर्ती       
   
  

 वसंत मून  बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून मागील काही दिवसांपूर्वी पेपरमिल काटा गेट परिसरात अपघात घडला होता त्यात 2 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.




 आज 28 नोव्हेम्बरला अगदी काही वेळापूर्वी 9:35 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर येथील दर्गा परिसरात एक दुचाकी चालक आपल्या दुचाकी ने जात असताना अपघात घडल्याची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार MH34 AG 3768 या दुचाकीने एक व्यक्ती संदेश फुलझेले रा. बल्लारपूर निवासी असून सदर व्यक्ती चंद्रपूर वरून बल्लारपूर ला येत असताना



 अपघात घडल्याची माहिती असून सदर व्यक्तीला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे सदर व्यक्तीला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय मेडिकल कॉलेज मध्ये भर्ती करण्यात आल्याची माहिती आहे सदर व्यक्तीचा अपघात घडल्याची माहिती मिळताच नगरसेवक सिक्की यादव यांनी काही नागरिकांच्या मदतीने जखमी बा व्यक्तीला त्वरित वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता मदत केली मात्र प्रकृती गंभीर असल्याने सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ दाखल केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!