नितीन येरोजवारनी स्विकारले प्रशांत बोबाटे यांचे आव्हान।

नितीन येरोजवारनी स्विकारले प्रशांत बोबाटे यांचे आव्हान।

मूल नगर परिषदेच्या निवडणूकीत येरोजवारचे विरोधात बोबाटे अपक्ष लढणार

मूल (प्रतिनिधी)

कट्टर हिंदुत्वाच्या मुद्यावरून, श्रीकृष्ण ग्रुप मध्ये चालू चर्चेत शिवसेनेचे तालुका अध्यक्ष नितीन येरोजवार आणि भाजपाचे कार्यकर्ते प्रशांत बोबाटे यांनी आगामी नगर परिषदेत एकमेकाविरूध्द लढण्यांचे आव्हान-प्रतिआव्हान दिले.  हे आव्हान दोघानी स्विकारून ‘डन’ केल्यांने आगामी निवडणूकीत चांगलाच रंग भरणार आहे.

शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर, हिंदुत्वाच्या मुद्दयावर राज्यपातळीपासून, स्थानिक स्तरावर नेते, कार्यकर्त्यात आपसात वाद होत आहे.  याचा प्रत्‌यय मूल शहरातही दिसून येत असून, श्रीकृष्ण ग्रुप वरील शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांची चॅलेंज चर्चा त्याचाच एक भाग आहे.

मूलचे नगर सेवक सुधीरभाऊच्या नावांवर व कार्यावर निवडूण आले आहे, स्वकर्तुत्वावर नाही, त्यामुळे भाऊवर टिका करू नये असा सुर शिवसेनेचे मूल तालुका अध्यक्ष नितीन येरोजवार यांनी लावला.  हिमंत असेल तर अपक्ष निवडणूक लढवून दाखवा असे आवाहनही दिले.  ही बाब भाजपाचे प्रशांत बोबाटे यांना खटकली व त्यांनी चँलेज ॲस्केप्ट करीत, नितीन येरोजवार विरोधात अपक्ष लढण्यांचे जाहीर केले.

प्रशांत बोबाटे हे भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आहेत.  नप सभापती विद्या बोबाटे यांचे पती आहेत. आगामी निवडणूकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिल्यास, ती नाकारून, आपल्या शब्दावर कायम राहतील काय? असा प्रश्नही या निमीत्ताने उपस्थित झाला आहे.

श्रीकृष्ण ग्रुपवरील स्विकारलेले एकमेकाचे विरोधात लढण्याचे आवाहन, नितीन येरोजवार आणि प्रशांत बोबाटे हे कायम ठेवतील काय? असा प्रश्न असून, दोघांचेही वार्ड, प्रभाग भिन्न असल्यांने, तसे काही होणार नाही असे काहींचे मत आहे तर, दोघेही शब्दाला जागणारे असल्यांने ते लढतीलच असाही काहीचा दावा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!