चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार : मोठ्या रुग्णालयातील महिलेचा उपचारादरम्यान ऑक्सिजन अभावी मृत्यू

चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार : मोठ्या रुग्णालयातील महिलेचा उपचारादरम्यान ऑक्सिजन अभावी मृत्यू



चंद्रपूर :प्रतिनिधी 

चंद्रपूर शहरात नामांकित रुग्णालय असून रुग्णाचा वेळीच उपचार मिळणे अपेक्षित आहे मागील काही दिवसांपूर्वी एका प्रतिष्ठित डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे जिवीत महिलेला मृत घोषित करण्यात आले.
मात्र अंतिम संस्काराची तयारी सुरू होण्यापूर्वी सदर महिलेच्या शरीरात हालचाल निर्माण झाल्यामुळे सदर महिलेला पुढील उपचारार्थ नागपुरात दाखल करण्यात आले होते या घटनेची शाई वाळते न वाळते तोच चंद्रपुरातील एका नामांकित रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म देणाऱ्या आईला योग्य वेळी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया येथील एक महिला डिलिव्हरीसाठी चंद्रपुरातील एका नामांकित रुग्णालयात दाखल झाली होती.
काल 14 नोव्हेम्बरच्या रात्री सदर महिलेची प्रसूती झाली सदर डिलिव्हरी नॉर्मल झाली असल्याची माहिती असून रात्री 11 वाजेपर्यंत सदर महिला नॉर्मल असल्याची माहिती होती मात्र रात्री 11 नंतर सदर महिलेला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला असल्यामुळे ऑक्सिजन लावण्यात आले.
मात्र कुटुंबियांच्या माहितीनुसार ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात नव्हते शिवाय याविषयी कर्तव्यावर असलेल्या संबंधित व्यक्तीला यासंबंधी माहिती सांगूनही दुर्लक्ष करीत असल्याची कुटुंबियांची माहिती आहे.
शिवाय सद्यस्थितीत देशभरात दीपावलीचा सण साजरा होत असल्यामुळे जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती नव्हती त्यामुळे उपचाराअभावी किंवा ऑक्सिजन अभावी सदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
इविज्ञानाने जरी मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असली तरी योग्य वेळी योग्य तो उपचार न मिळाल्यामुळे एखाद्या निष्पाप जीवाला आपला जीव जर गमवावा लागत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असेल शासन प्रशासन आरोग्य सेवेवर अधिक तरतूद करीत असले तरी प्रशिक्षित तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असली पाहिजे जेणेकरून कुणाचाही उपचारा दरम्यान मृत्यूला सामोरे जावे लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!