माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त काँग्रेस तर्फे गरजवंतांना केले ब्लॅंकेट चे वाटप
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - दिनांक.१९/११/२०२० रोजी तालुका कांग्रेस कमेटी तसेच युवक काँग्रेस चे वतिने तालुका कांग्रेस कार्यालय चिमुर येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.तसेच या जयंती निमित्त उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथील रुग्णांना फळ वाटप व मनोरुग्ण तसेच गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष माधव बापु बिरजे , धनराज मालके ,विलास डांगे,सोरदे , युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष गौतम पाटिल,अविनाश अगडे , पप्पु शेख , अमित मेश्राम ,शुभम पारखी, तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपसथित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!