श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या पाठपुराव्याने निराधार महिलेस कुटुंब अर्थसहाय्य योजने चा लाभ मंजूर

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - राजुरा तालुक्यातील साखरवाही येथील श्रीमती उषा लोखंडे यांच्या पतीचे निधन झाल्याने तीचेवर दुःखाचे डोंगर कोसळले, कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जिम्मेदारी उषा लोखंडे यांच्यावर आली. 

सदर महिला निराधार योजना कशी मिळवायची याची माहिती घेण्यासाठी राजुरा येथे आली मात्र सदर महिलेला निराधार, योजना, व कुटुंब अर्थ सह्याय योजनेचा लाभ कसा मिळवायचा याची कुठलीही माहिती नसल्याने शेवटी सदर बाबा श्रमिक एल्गार चे कार्यकर्ते लोमेश मडावी यांनी उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांच्या निदर्शनास आणून दिली.  

माणुसकीच्या नात्याने सामाजिक कार्याचे भान ठेऊन सदर महिलेला लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून तहसील कार्यालय राजुरा येथे दाखल केले. व सतत पाठपुरावा करून दिनांक १२/११/२०२० ला उषा लोखंडे या निराधार महिलेस कुटुंब अर्थ सह्याय योजनेचे विस हजार रुपये मिळाले. 

यावेळी उषा लोखंडे यांनी उपाध्यक्ष मेश्राम, कार्यकर्ते लोमेश मडावी, दीपक मडावी, तुळशीराम किंनाके, संतोष कुलामेथे यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!