कार्तीक मास आणि तुळशीचे महत्त्व
|| जगद्धात्री नमस्तुभ्यं विष्णोश्च प्रियवल्लभे
,
यतोब्रह्म दयो देवा:
सृष्टीस्थित्यंत कारीणी ||
लेख :भारती कोंतमवार
कार्तीक मासात तुळशीला फार महत्त्व आहे. तुळशी ही विष्णुप्रीया आहे.तुळशी ही खूपच उपयोगी वनस्पती आहे. तिचे अध्यात्मीक व वैज्ञानिक उपयोग खुप आहे. तुळशी हि औषधी वनस्पती आहे.पुष्कळशा रोगांवर तिचा उपयोग होतो. सर्दी ,ताप , खोकल्यावर तिचा रस रामबाण उपाय आहे. ती ऑक्सिजन वायु जास्त प्रमाणात वीसर्जीत करत असल्यामुळे तिच्या आजुबाजुचे वातावरण शुद्ध असते.तिच्या परिसरात प्राणायाम केल्याने तब्येतीवर त्याचा चांगला परिणाम होतो. श्री वीष्णुपुजेत तिचे खुप महत्त्व आहे.त्यांची पुजा तुळशीदलाशिवाय अपूर्ण आहे.तुळशीच्या पुजनाने मोक्षप्राप्ती होते.तुळशीमध्ये सर्व देवतांचा वास आहे.म्हणुनच ती पुजनीय आहे.तुळशीजवळची कोसभर भुमी गंगेसारखी पवीत्र होते.तुळशीवरून जाणारा वारा जीथुन जीथुन जातो तीथे पवीत्र वातावरण तयार होते व वातावरणात कृष्णतत्व प्रसारित करते.प्रसादावर तुळशीदल ठेवल्याशिवाय प्रसाद पुर्ण होत नाही.अशा तिच्या अनेक गुणांमुळे ती वीष्णुला प्रीय झाली आहे.म्हणुनच भारतीय संस्कृती मध्ये घराघरात तुळशीवृंदावन असते.तिचे पुजन घराघरात होते.
श्रीविष्णुचरणी अनंतकोटी कृतज्ञता व्यक्त केली तरी कमीच आहे की त्यांनी एवढी गुणकारी वनस्पती आपल्याला दिली.कार्तीक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत घरोघरी तिचे श्रीकृष्णासोबत लग्न लावले जाते.आणि त्यानंतरच लग्नकार्य सुरू होतात.एवढे या तुळशीचे आपल्या जीवनात महत्त्व आहे.
अशा या तुळशी मातेला माझा नमन असो.
||जय तुळशी माता ||



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!