गुणवंत कलाकार म्हणून मानधन मिळण्याची शिफारस
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
गावा गावात जनतेच्या सहकार्याने ग्रामस्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते परंतु यापासून नागरिक दूर गेल्याचे दिसत येताच तिथूनच जवळ असलेल्या दहेगाव झरी, कवडसी देश येतील शंकर विठोबा उईके, गुलाब हरी थेरे या व्यक्तींनी भंडारा, नागपूर, चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यातील गावागावात फिरून हातात झाडू घेऊन रस्त्याची सफाई, भजन कीर्तन हरिपाठ, हुंडाबळी, दारूबंदी, व्यसन मुक्ति, तसेच गावोगावी आणि बाहेरगावी कार्यक्रम करीत ग्रामस्वच्छता अभियानाला सहकार्य करत असताना त्यांचे कार्यक्रम दूरदर्शन केंद्र नागपूर, आकाशवाणी केंद्र,नागपूर पंढरपुरी वारी, आंभोरा आळंदी, देऊळ पदयात्रा यात्रा ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहे कोरोनाचा काळात साबणाने हात धुवावे, शक्यतो लोकांशी संपर्क टाळावा एक फुटाचे अंतर ठेवावे असे मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलेली आहे या विषयावर कार्यक्रम राबविले असून जनजागृतीचे कार्य 35 वर्षापासून सुरु केले मात्र त्यांच्या या कार्याला अजून पर्यंत दखल घेण्यात आलेली नसून त्याकरिता ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रदान करून गुणवंत कलाकार म्हणून मानधन सुरू करण्यात यावे अशी शिफारस तिनी जिल्ह्यातील जनप्रतिनिधी, परिसरातील लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकार्यांनी शिफारस शासनाकडे केली आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!