क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका शिवापूर बंदर द्वारा क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंती महोत्सव कार्यक्रम संपन्न

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - दिनांक.१५/११/२०२० ला  विश्वशांतिदुत बहुउद्देशीय संस्था संचालित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका शिवापूर बंदर तर्फे बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बादलराज श्रीरामे, सुशील नंन्नावरे, अतुल तराळे तसेच अध्यक्षस्थानी विनोद श्रीरामे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बादलराज श्रीरामे व अतुल तराळे यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सूरज गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन अनिरुद्ध वासनिक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी अभ्यासिकेत अभ्यास करणारे सर्व विदयार्थी व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील नागरिक सुद्धा यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!