आता ७/१२ आणि ८अ नमुन्यावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही; परिपत्रक जारी
आता ७/१२ आणि ८अ नमुन्यावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही; परिपत्रक जारी
बल्लारपूर (प्रतिनिधी)
डिजिटल स्वाक्षरीतील डेटाबेस आधारित संगणकीकृत सातबारा, गाव नमुना ८ अ आणि गाव नमुना नंबर ६ इत्यादी अभिलेख्यास कायदेशीर वैधता राहणार आहेत.
या नमुन्यांवर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही.
शासनाच्या परिपत्रकानुसार या नमुन्यांचा अधिकार अभिलेख विषयक उतारा कायदेशीर व शासकीय, निमशासकीय कामकाजासाठी वैध राहतील.
यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व क्षेत्रीय महसुली प्राधिकारी अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाच्या महसूल व वन विभागाने २३ नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाव्दारे देण्यात आले आहेत.
सर्व क्षेत्रातील अपडेट्ससाठी तुमचा Whatsapp Number रजिस्टर करा.
http://www.jaybhim.today


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!