मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर आणि बोर्डा केंद्रातील एकूण 9 शाळांमध्ये माझी शाळा - माझी सुरक्षा उपक्रम

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर आणि बोर्डा केंद्रातील एकूण 9 शाळांमध्ये माझी शाळा - माझी सुरक्षा उपक्रम

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :(हर्षानंद कऱ्हाडे) 

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्था चंद्रपूरचे वरिष्ठ जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. प्रशांत लोखंडे व शाळा सह्यय अधिकारी मंगेश रामटेके यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात स्केल कार्यक्रमा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर आणि बोर्ड कल्सटर मधील एकूण 9 गावामध्ये यामध्ये जुनोना, लोहारा,बोर्ड,चेकनिंबाडा, चिचपल्ली,अजयपूर, गोंडसावरी, पिंपळखुट,नागाला (म.) या गावातील वर्ग ६ वी ते वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून जीवन कौशल्य वाढविणे उपक्रम चालू झालेला असून, बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत माझी शाळा माझी सुरक्षा हा उपक्रम घेण्यात येत आहे. त्यामध्ये सध्या कोविड मुळे शाळा बंद आहेत जर अशा परीस्थितीत शाळा चालू झाल्यास शाळा व बालकांची सुरक्षितता यासंदर्भात चंद्रपूर तालुक्यातील या नऊ गावातील विद्यार्थ्यांकडून त्यांचे मत निबंधाच्या आणि चित्राच्या माध्यमातून जाणून घेतल्या गेले. तसेच पालक,सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ह्यांचे सुध्दा मत जाणून घेतले.हे उपक्रम घेत असताना शासनाने दिलेल्या दिशा निर्देशाचे योग्य पालन करून उपक्रम पार पाडला आहे.
माझी शाळा माझी सुरक्षा उपक्रमाला उपस्थित शाळा सहाय्यक अधिकारी मंगेश रामटेके , समुदाय समन्वयक प्रेम जारपोटवर जुनोना, प्राजक्ता दुर्योधन अजयपूर, मीनल दोडके चिंचपल्ली,अश्विनी गौरकर चेकनिंबाडा, सुलभा जुगनाके पिंपळखुट,राणी कावळे गोंडसावरी, माधवी पिल्लरवार नागाला म.,हेमलता पेंदाम लोहारा, सचिन डोरलीकर बोर्डा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!