पदवीधर मतदारांना मतदानाकरिता 1 डिसेंबर रोजी सुट्टी
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - दि.23 नोव्हेंबर 2020 महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीकरिता दिनांक. 01 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात मतदान घेण्यात येणार आहे. सदर निवडणूकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमत्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमत्तीक रजेव्यतिरिक्त असेल असे नागपूर पदवीधर मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!