भरधाव कारची रानगव्यला धडक, रानगवा गंभीर जख्मी
तळोधी(बा.)
काल सायंकाळी जवळपास 6:30 ला तळोधी कडून नागभीड ला जात असलेल्या श्री. डॉ. अनिल कोरपेनवार, प्राचार्य महात्मा गांधी कालेज नागभीड, यांच्या मालकीची ,फोर्ड कंपनीच्या इकोस्पोर्ट कार क्रमांक.MH -40-BE-7129 ने रस्ता ओलांडत असलेल्या रानगव्याला जोरदार धडक दिली. यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार 40 मिटर रस्याच्या कडेला पलटत गेली. मात्र यात कोरपेनवार यांना किरकोळ जखमा झाल्या मात्र जोरदार धडक लागल्याने रानगव्यला गंभीर दुखापत झाली आहे. रात्र भर रानगवा घटना स्थळाच्या पासून 100 मिटर अंतरावर सामाजिक वनीकरण विकास महामंडळ बाळापूर चे कक्ष क्र.69 मिंडाळा बिटात जख्मी आढळून आला आहे.
आज सकाळी सामाजिक वनीकरण विकास महामंडळाच्या वर्षा धुर्वे मँडम वनरक्षक मिंडाळा, श्री काळबांधे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण विकास महामंडळ बाळापूर, यांनी मोक्का पंचनामा करून वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर घटनास्थळ हा वन्यप्राण्यांच्या प्रवासाची जागा आहे.आणि यामुळे हा संवेदनशील स्थळ असल्याने त्या सुचना देनारे फलक रस्त्याच्या कडेला लावलेले असतांना सुध्दा अशा प्रकारे निस्काळजीपने भरधाव वेगाने वाहन चालवून नेहमीच अशा घटनेने वन्यजीव मारले जात आहेत, अशा भरधाव वेगाने वाहने चालवीनार्या ंंवर कढोर कार्यवाही केली जावी. असी वन्यजीव प्रेमींनी मागणी या निमीत्ताने केलेली आहे. व हा वन्यप्राणी भ्रमनमार्ग असल्याने या ठिकाणी ऊडानमार्ग तैयार करन्यात यावे असेही वन्यजीव प्रेमींनी आपले विचार मांडले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!