शहिद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रेरणेने आदिवासींनी पेटून उठले पाहीजे
शहिद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रेरणेने आदिवासींनी पेटून उठले पाहीजे.
मुलनिवासी परधान समाज मंच चे आवाहन
मुलनिवासी परधान समाज मंच यांनी स्वातंत्र्यविर शहिदवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांचा १६२ वा शहीद दिन आयोजित करण्यात आला.
१८५७चे स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांना शहिद दिनानिमित्त आदरांजली
स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांचा आदर्श समाजाने घेण्याची व अंगीकारण्याची गरज.
जितेंद्र पेंदाम
उपसंपादक पब्लिक पंचनामा
सन १८५७चे क्रांतिसुर्य स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांना शहिद दिनानिमित्त मूलनिवासी परधान समाज मंच च्या वतीने लोनवाही (सिंदेवाही) येथील गिरीधर गेडाम यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात शहिद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलदास मेश्राम हे होते तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजू ताडाम ,मिलिंद कोवे,संजय कोने, सुनिल उईके, नेताजी सोयाम तसेच मुलनिवासी परधान समाज मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर महान क्रांतिकारी बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या प्रेरणेने आदिवासींनी पेटून उठले पाहीजे असे विचार प्रगट मंगलदास मेश्राम यांनी केले .
राजु ताडाम यांनी समाजाने आदर्श घेतला पाहीजे असे विचार प्रतिपादन केले.
सुनिल उईके यांनी स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांच्या विचारावर प्रकाश टाकला तर नेताजी सोयाम यांनी जिवन चरित्रातील विचार मंथन केले .
उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार प्रगट केले.
कार्यक्रमाचे संचालन नेताजी सोयाम यांनी केले तर आभारप्रदर्शन दिवाकर मसराम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गिरीधर गेडाम, प्रमोद कोने, संजय कोवे , रमेश सिडाम, प्रशांत कोवे,विक्की कुलसंगे, दिनकर उईके, रवी आळे,वासुदेव कोडापे,हरीराम नैताम ,दोडकू मेश्राम, अभय उईके, दिपक म्हैसकर ,युवराज मेश्राम, गंगाधर सोयाम, अमर गेडाम.यांनी परीश्रम घेतले.
सन १८५७ चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके ज्यांनी चंद्रपूर गडचिरोली भागातील अन्याय व अत्याचार विरोधात लढा उभा केला. सावकार व इंग्रजाविरोधात लढा दिला. सावकारांच्या जाचातून त्यांच्या हुकूमशहातुन सुटका केली.ते वयाच्या 25 व्या वर्षी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला.
इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. इंग्रजांना नाकीनऊ आनलं. त्यामुळे साहजिकच इंग्रजाने स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांना टॉरगेट केले . कारन शहिद वीर बाबुराव शेडमाके हे अत्यंत हुशार व चलाख होते. इंग्रजांचे डावपेच ते हानुन पाडायचे. त्यामुळे इंग्रजांना कसल्याही परीस्थितीत वीर बाबुराव शेडमाके पाहिजे होते.
त्यामुळे त्यांनी कुटनितीचा वापर केला.राणी लक्ष्मीबाई शेडमाके ह्या त्याच्या काकू यांना राज गादी व सर्व साम्राज्य भेट देण्याची आफर दिली. आणि अखेर तो दिवस उजाडला बाबूरावांना जेवतांनाच इंग्रजांनी पकडले.
आपल्याच लोकांनी घात करतील असा विचारही स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांना आलेला नसेल. पण घात झाला. चांदागड जिल्ह्याच्या कारागृहामध्ये स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांना फाशी दिली तोदिवस होता २१ आक्टोबर १८५७ एका महान क्रांतिकारी वीराचा अस्त झाला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!