1857 चे शहिद विर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांना आदरांजली अर्पण
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - 1857 चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ज्यांनी चंद्रपुर गढचिरोली भागातील सावकार , तथा इंग्रजांविरुद्ध लढा दिला गडचिरोली व चंद्रपुर येथील गोंड , तथा इतर गैर गोंडियन समाजास सावरकरांच्या जाचातून त्यांच्या हूकूमशाही व अत्याचारातून सुटका करून देण्या करिता व इंग्रजाविरूद्ध देश सेवा करून फक्त लोकांनाच नव्हे तर नागविदर्भ ( गोंडवाना ) व भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्या करिता वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांनी प्रत्येक समाजातील तरून युवकांना सोबत घेऊन जंगोम सेना तयार केली व सावकार , आणी इंग्रजांच्या विरूद्ध लढाई सुरू केली. बाबुरावांना व जंगोम सेनेला भरपुर यश मिळाले सावकारांच्या मुसक्या बांधल्या आणी इंग्रजांना तर सळो की पळो करून इंग्रज सैन्याला व इंग्रज कॅप्टन अधिका-यांना कापून टाकले त्यांचा फडशा पाडला. इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. इंग्रजांनी नाना विविध प्रकारचे प्रयत्न केले बाबुरावांना पकडण्याचा व त्यांना खत्म करण्याचा परंतू विर बाबुराव अत्यंत चतुर व हुशार असल्या मुळे इंग्रजांचे सर्व डावपेच हानून पाडायचे. इंग्रजांचा वारंवार पराभव , खुन , त्यांचे कार्यालय, छावण्या उध्वस्त करने सुरूच असल्या मुळे इंग्रज अधिकारी चांगलेच घाबरलेले असायचे ... पण त्यांना पर्याय सापडत नव्हता ते बाबुरावांना पकडण्या साठी खुप प्रयत्न केले पण काही फायदा नाही.
शेवटी इंग्रजांनी कुटनिती वापरली व राणी लक्ष्मी बाई शेडमाके बाबुरावांच्या काकू यांना राज गादी व सर्व साम्राज्याची भेट देण्याची ऑफर दिली व बाबुरावांना पकडण्यासाठी अशा स्वार्थी बाईंची निवड केली जी स्वता त्या शेडमाके परिवारातील होत्या ....व तो दिवस आला आणी बाबुरावांना राणी लक्ष्मी बाई च्या घरी जेवतांना पकडले .. व चांदागढ जिल्ह्याच्या कारागृहामधे 1 दा सोडून 3 दा फशी दिली पण बाबुराव काही मरेना शेवटी दुसरी निती वापरून बाबुरावांना फाशिची शिक्षा दिली व बाबुराव सेडमाके सुर्याचा अस्त 21 ऑक्टोबर 1857 साली झाला ... पण जाता जाता प्रत्येक देशवासियांच्या मनात देश स्वातंत्र्य करण्याची आग लावून गेले.
अशा विर बहाद्दराचा आज शहिद दिवस चिमूर येथे जागतिक गोंड सगा मांदी शाखा चिमूर च्या वतीने घेण्यात आला कोविड 19 चे सर्व नियमांचे पालन करून शहिद दिवस आदरांजली देऊन करण्यात आले . यात गोंड समाजाचे मुर्सैनाल मनोजसिंह गोंड मडावी मुर्सैनाल चिमूर यांनी थोडक्यात पुजा व मार्गदर्शन केले ... कार्यक्रमात उपस्थिती - तिरू . दिलीप वटे , दिपक कुमरे , भास्कर कळाम , लक्ष्मण मडावी , नरेश कुळमेथे , दिलीप मडावी , शंकर मडावी , महेश कुमरे , डाॅ . गजानन मडावी , गणेश पेंद्रे , धैर्य वटे , जपान वटे , तिरूमाय कविता सु. मसराम , कुंदा दि. वटे , आशा मो. मडावी , डाॅ. मडावी मॅडम , तेजू मडावी मडावी बाई , स्मिता म. मडावी तथा शेकडो गोंड समाज बांधव उपस्थित होऊन सहकार्य केले व शहिद दिवसाचा कार्य पार पडला
जय सेवा जय रावण , जय गोंडवाना , जय बाबूराव शेडमाके ना सेवा सेवा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!