कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यास उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक मदत..!!

कॅन्सरग्रस्त शेतकऱ्यास उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक मदत..!!

बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचे विशेष प्रयत्न; 'शेतकरी कल्याण निधी' योजनेतून दिला मदतीचा हात

तळोधी (यश कायरकर)
    चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्याच्या हिताची बँक म्हणून ओळखली जाते.. त्याची प्रचिती आज पुन्हा आली.. यापूर्वी ही अनेक आजाराशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत केली आहे...किरमटी मेंढा येतील कॅन्सर या रोगाने ग्रस्त असलेले नामदेव देवाजी कोरे (70) यांना बँकेचे संचालक गजानन वासुदेवराव पाथोडे यांच्या प्रयत्नातून बँकेच्या शेतकरी कल्याण योजनेतून कॅन्सर च्या उपचाराकरिता रुपये 40,000 चा  धनादेश आज बँकेचे संचालज गजानन पाथोडे यांच्या हस्ते  त्यांचा मुलगा सुरेश नामदेव कोरे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला... यावेळी  सेवा सहकारी संस्था मेंढा चे अध्यक्ष आनंद कोरे,गटसचिव कुंभरे, बँकेचे निरीक्षक नंदेश्वर भर्रे यांची उपस्थिती होती..!!
    कोरोना महामारीच्या काळातही बँक व बँकेच्या संचालक गजानन पाथोडे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!