कोरोणाच्या सावटमध्ये ही वटपौर्णिमा साजरी

कोरोणाच्या सावटमध्ये ही वटपौर्णिमा साजरी.


शंकरपूर (जगदीश पेंदाम)
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले त्या ढायी आम्हा विठ्ठल पावले।।
असे म्हणत वारकरी पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतात अगदी अशीच भक्ती वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनी महिलांनी वटवृक्षाची मनोभावे पूजा करून पती भक्तीसाठी दीर्घायुष्याची कामना येथील हनुमान किल्ला मंदिर येथे वडाच्या झाडाची पूजा करून केली आहे...
वटपौर्णिमेला विवाहित महिला वटपौर्णिमेचे व्रत करून यादरम्यान महिलांनी त्यांच्या पतीला उत्तम आरोग्य,दीर्घायुष्य साठी व घरात सुख, समृद्धी नांदावी म्हणून वडाच्या झाडाची पुजा करतात शुक्रवारी सकाळपासूनच गावातील व परिसरातील महिला वडाच्या झाडाची पूजा करताना दिसत होत्या तसेच महिला सोबत तरुण मुली लहान मुली सुद्धा पूजा करताना दिसत होते तरी यंदा कोरोणाचे सावट असल्यामुळे अनेक महिलांनी घरीच पूजा करून वटपोर्णिमा साजरी केली आहे त्यामुळे यावर्षी वटपूजनांचे महत्त्व वेगळेच पाहायला मिळाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!