पब्लिक पंचनामा इफेक्ट - मानकापूर बंधाऱ्याची चौकशी सुरू
पब्लिक पंचनामा इफेक्ट - मानकापूर बंधाऱ्याची चौकशी सुरू
सावली (विशाल नर्मलवार)
तालुक्यातील मानकापूर येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे कामात गैरव्यवहार झाल्याची बातमी 'पब्लिक पंचनामा' मध्ये प्रकाशित होताच, पंचायत समिती वर्तुळात खळबळ माजली. याप्रकरणी आज तातडीने या कामावर सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार व व अन्य अभियंते यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. याबाबत सभापती कोरेवार यांनी कामाची सखोल चौकशी करण्याचे लेखी आदेश अभियंत्यांना दिले.
या बंधाऱ्याचे कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला. रेतीची तस्करी झाली. कामात हयगयपणा, झाला परंतु राजकीय दबाव असल्याने कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. ही बाब आज पब्लिक पंचनामाने उघडकीस आणताच संबंधितांनी बंधाऱ्यावर भेट देऊन कामाची प्राथमिक पाहणी केली. हे काम निकृष्ट असल्याचे मान्य केले. पब्लिक पंचनामानी बंधाऱ्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल गावकर्यांनी व शेतकऱ्यांनी पब्लिक पंचनामाचे आभार मानले आहे.
उप अभियंता श्री. ननावरे, कनिष्ट अभियंता गंधे यांनी माझे समक्ष चौकशी केली. निकृष्ट दर्जाचे काम काढून दुरुस्ती करण्यात येत आहे - विजय कोरेवार, सभापती, पंचायत समिती, सावलीमूळ बातमी येथे वाचा




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!