आर्थिक तंगीने बल्हारपुरात मजूरानी केली आत्महत्या
- आर्थिक तंगीने बल्हारपुरात मजूरानी केली आत्महत्या
- आम आदमी पार्टी च्या मदतीने झाले पोस्टमार्टम आणि अंत्यसंस्कार
बल्लारपूर (वार्ताहर)
लॉकडाउनच्या काळात आर्थिक परिस्थिती खालावल्याने बल्लारपूरातील एका मजुरांनी आत्महत्या केली. ही घटना काल (दिनांक १६) चे रात्र अंदाजे अकरा वाजताच्या दरम्यान घडली. राजशेखर गोपाल वेलपुरी (३४) असे या आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे.
गोपाल हा बल्लारपूर पेपर मिल मध्ये ठेकेदारी मजूर म्हणून काम करीत होता. पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीसह तो किरायाच्या घरात राहत होता.
लाॅकडॉऊन मध्ये गोपालची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली घर चालविणे अत्यंत कठीण झाल्याने, त्यांनी आपल्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे.
मृतकाचे आई आणि भाऊ शहरातच दुसरीकडे किरायाने राहतात.
मृतकाच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती कि आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटनमंत्री परमजीत सिंह झगडे, शहर संयोजक रवी पुप्पलवार, सचिव आशीफ हुसेन यांनी आर्थिक मदत केल्यामुळे घटकाचे पोस्टमार्टम आणि अंत्यसंस्कार होऊ शकले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!