प्रा. आ. केंद्राला सदिच्छा भेट.

प्रा. आ. केंद्राला सदिच्छा भेट.


नवनिर्माणाधिन इमारतीच्या बांधकामाची केली पाहणी.




मूल (प्रकाश चलाख)

जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी मुल तालुक्यातील राजोली प्रा. आ. केंद्राला कोरोणा विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट दिली. आणि उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी गोरे यांचेशी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोणा प्रादुर्भावासंबंधित अनेक विषयांवर चर्चा केली.

स्थानिक पातळीवर नागरिकांना खबरदारी परतण्याच्या सूचना करा, असे निर्देश दिले.तसेच प्रा. आ. केंद्राच्या नवीन निर्माणाधीन असलेल्या इमारतीचीही त्यांनी पाहणी केली.



याप्रसंगी त्यांसमवेत, सरपंच आनंद पा. ठिकरे, उपसरपंच सचिन वलकेवार, चंदू नामपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी गोरे, परिचर तेजराव बोधनकर, सुरेश पप्पुलवार यांसह आदि मंडळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!