मानकापूर येथील बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट

मानकापूर येथील बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट


सावली (विशाल नर्मलवार)
मानकापूर येथील बंधाऱ्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून याकडे अधिकारी मात्र राजकीय दबावाखाली दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. याबाबत सावली तालुका आम आदमी पार्टीने देखील कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
उल्लेखनीय म्हणजे या कामाचे निमित्ताने रेती जमा करून या रेतीची तस्करी केली असल्याची चर्चा आहे. सदर बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकही करीत आहेत.

सावली तालुक्यातील मानकापूर येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी व पाणी जमिनीत मुरावे यासाठी नाल्यावर सिमेंट प्लग बंधारा बांधकाम मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषद जलसंधारण लघू पाट बंधारे विभागामार्फत निविदा मंजूर करण्यात आली मात्र मंजूर कंत्राटदार काम न करता त्याच क्षेत्रातील राजकीय पदाधिकाऱ्याचे नातेवाईकास काम मिळाले. सदर बांधकामाचे अंदाजपत्रक 10 लक्ष रूपयाचे असून सिमेंट बंधारा बांधकाम आहे. बांधकामाचे मॉस काँक्रीटसाठी ४० एमएम तर आर सी सी साठी 20 एम एम गिट्टीचा वापर आहे परंतु जास्तीत जास्त 40 एम एम गिट्टीचा वापर करण्यात आलेला आहे. सुरवातीला बांधकामासाठी १० फूट खोदकाम पोकलन मशिनद्वारे करण्यात आले परंतु दुसऱ्याच दिवशी जोराचा पाऊस आल्याने खोदकाम जैसे ते झाले त्याच्यावरच बंधाऱ्यांची पायाभरणी करण्यात आली. लोहा 3 फुटाचे तुकडे वापरून अत्यंत कमी वापत करण्यात आला तर पूर्ण क्रांक्रीट न करता बाजूला क्रांक्रीट व मध्ये रेती भरलेल्या बॅगनी क्रांक्रीट पूर्ण करण्यात आलेला आहे. अल्पावधीतच बंधारा कोसळून सिंचनापासून वंचित राहण्याची पाळी येण्याची भीती असल्याने सदर निकृष्ट बंधारा बांधकामाची चौकशी करण्यात यावी ही मागणी शेतकरी करीत आहेत. सभापती विजय कोरेवार यांच्या क्षेत्रातील प्रकरण असल्यामुळे याबाबत कारवाई करण्यास चलढकल करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!