चिमुर तालूक्यात लॉकडाऊन च्या काळात पिंपळगाव व मेटेपार येथे पुल बांधकाम ठेकेदार सर्रास चोरीच्या रेतीचे करतात वापर महसूल विभागाचे दुर्लक्ष



तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.१५/०६/२०२० लॉकडाऊन च्या काळात जगभरात कोरोना कोविड - १९ विषाणुजन्य संसर्गाच्या आजाराने थैमान घातले आहे.याचाच फायदा रेती तस्कर,कर्मचारी व अधिकारी उचलीत असून अवैध रेती तस्करी व मुरमाचे अवैध उत्खनन दिवस - रात्रो ला सुरू आहे.पण याकडे पुर्ण पणे महसुल विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत अाहे.
पिंपळगाव येथे नदीच्या पुलाचे काम सुरू अाहे या कामासाठी लागणारी रेती चोरीची वापरण्यात येत अाहे.अाता पर्यंत शेकडो ब्रास रेती या कामावर वापरण्यात अाली आहे.व शेकडो ब्रास रेतीचा साठा साठवून ठेवण्यात येत अाहे.तसेच मौजा मेटेपार या गावामध्ये सुध्दा ठेकदाराने रस्त्याच्या कामासाठी शेकडो ब्रास साठवन करून ठेवण्यात अाली अाहे.
पण तलाठीला या बद्दत संपुर्ण माहीती असुन शुध्दा त्या रेती साठ्यावर अाता पर्यंत कोणतीही कारवाही का केली नाही किंवा वरिष्ठांना या बद्दलची माहीती कळविण्यात का आली नाही.या मागे तलाठ्याचे पुर्णपणे सहकार्य असल्याचे कळते.
यामुळे रेती माफिया व अवैद्य मुरमाचे उत्खनन करणाऱ्याची हिम्मत वाढलेली आहे.जर वेळेवर कार्यवाई करण्यात आली असती तर तस्कऱ्यांची पत्रकार,तलाठी व अधिकाऱ्यांना धमकी देण्याची हिम्मत झाली नसती.म्हणून महसुल विभागाणी तात्काल यावर कार्यवाई करून व जातीने लक्ष देऊन दंड वसुल करण्यात यावा व फौजदारी गुणे नोंद करण्यात यावे.अशी चिमुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!