जंगलातील चितळ शहरात


मूल (प्रतिनिधी)

शहरातील भटके कुत्रे मागे धावल्यांने भरकटलेली चितळ पकडण्यास मूल वनविभाग यशस्वी झाले. ही हरीण बराच वेळ, मूल शहरात धावल्यांने शहरवासीयांची चांगलीच करमणूक झाली.

आज सकाळी 11 वाजताचे सुमारास हे चितळ सुरूवातीला कन्नमवार सभागृहाचे मागील भागातील पाटबंधारे कार्यालयात दृष्टीपथास आली. तीथून ती नगर पालिकेच्या परिसरातून रामलिला भवनाचे भागात फिरली. वनविभागाला माहिती होताच, विशेष व्याघ्र सरंक्षण दलाचे पथक हजर झाले. या चितळाला पकडण्यांचे प्रयत्न केले, मात्र ती उडी मारून पसार झाली. येथे नागरीकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली. या चितळास अखेर ताडाळा रोडवर भटकत असतांनाच, विशेष व्याघ्र सरंक्षण दलाने तीला अलगद पकडले.
चितळाला यशस्वी पकडण्यासाठी विशेष व्याघ्र सरंक्षण दलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, प्राणीमित्र उमेशसिंह झिरे, प्रादेशीक वनविभाग मूलचे क्षेत्रसहाय्यक प्रशांत खनके, वनरक्षक सुभाष मऱ्हसकोल्हे, स्वंयसेवक राम करकाळे, अंकुश वाणी यांचेसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


मूल येथील पशुवैद्यकिय रूग्णालयात प्राथमिक उपचार करून, डोणी गावच्या जंगलात सोडण्यात आले. हे चितड नर जातीची व 3 वर्ष वयाचे असल्यांची माहीती प्राणीमित्र उमेशसिंह झिरे यांची आमचे प्रतिनिधीला दिली.

आज दिवसभर या हरीणीच्या आगमनाचीच चर्चा मूल शहरात होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!