प्रवास्याकडून लाल परी घेत आहे दुप्पट तिकिट
कोरोनाच्या नावावर प्रवास्याची लूट
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दि.१२/०६/२०२० संपूर्ण विश्वात कोरोना कोविड - १९ या विषाणूजन्य आजारामुळे असंख्य जनता मृत्युमुखी पडली असून २२ मार्च २०२० पासून लॉक डाऊन व संचारबंदी कलम १४४ सुरू केली आहे. जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एस.टी ( बस ) सुरु करण्यात आली व लहान मुलांना तसेच वयोवृद्धांना बस द्वारे प्रवास करणे बंदी घालण्यात आली आहे. यामुळे लाल परीने प्रवासी प्रवास करण्यास टाळत आहे.
म्हणून एस.टी.महामंडळ दरवेळी खाजगी ट्रॅव्हल्स व छोट्या खाजगी वाहनांमुळे तोटा सहन करावा लागतो. आणि आज महामारी सुरु आहे एकिकडे जनतेच्या हाताला काम नाही.व रस्ते जीवघेणा स्वरूपाची आहे. आणि तरीही दुप्पट तिकिटे घेतली जाते आहे.सरकारने याकडे लक्ष देऊन जी अगोदर तिकिट घेण्यात येत होती तिच तिकिट घेण्यात यावी अशी मागणी जनतेत जोर धरू लागली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!