मूल येथे भगवान बिरसा मुंडा पुण्यतिथी साजरी
मूल (प्रतिनिधी)
मूल मध्ये अखित भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा शहीद दिन साजरा करण्यात आला.
ब्रिटिश साम्राज्याचे विरोधात आदिवासी समाजालाच नव्हे तर सर्व जनतेला हक्क आणि अधिकारासाठी क्रांतीचे बीज पेरणाऱ्या महान जननायक धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची १३० वी पुण्यतीथी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेच्या वतीने परीषदेचे अध्यक्ष अशोक येरमे यांचे घरी घेण्यात आली. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि मेणबत्ती लाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी परिषदेचे अध्यक्ष अशोक येरमे यांनी त्यांच्या जीवनसंघर्ष बद्दल माहिती दिली. कोरोनाचे पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग ठेवून हा कार्यक्रम घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी अ.भा.आ. वि. परिषदेचे प्रेमदास सुरपाम, बंडूजी गेडाम, हेमंत कन्नाके, भारत सलाम, दिपक मडावी, भास्कर परचाके, मंजुषा येरमे, मनिषा कन्नाके, अल्का सलाम, सपना परचाके उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!