पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मजूर जखमी
पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात मजूर जखमी
सिंदेवाही (शांताराम आदे)
तालुक्यातील मीनघरी या गावात राहणारा विलास जनार्धन कोकोडे (४४) हा तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेला असता तर वाघाने त्याच्यावर हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात विलास गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटे सहा वाजताच्या दरम्यान घडली. सुदैवाने विलास या हल्ल्यात वाचला असून त्याच्यावर उपचार करण्याकरिता चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले.



Follow News
उत्तर द्याहटवा