दहावीचा भूगोल - शिक्षण विभागाने घेतला निर्णय
पब्लिक मीडिया ग्रुप
पुणे | कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द झाला होता. त्यामुळे आता इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून भूगोल विषयाला गुण दिले जाणार आहेत.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने याबाबतची माहिती दिली. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांना कार्यशिक्षण विषयाचे गुणही सरासरीनुसार मिळणार आहेत.
राज्यात दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 दरम्यान नियोजित होती. सर्व पेपर झाल्यानंतर केवळ भूगोलाचा पेपर बाकी होता. मात्र कोरोना संकटामुळे हा पेपर आधी पुढे ढकलण्यात आला, मग शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, शिक्षण विभागाने याआधी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांची पुढील इयत्तेत वर्णी लागली होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!