रमजान ईद

शुक्ल पक्षातील चंद्राच्या कोरीचे महत्व
हिंदु धर्मात ही पवित्र सन,उत्सव म्हनुन साजरे करतात तर मुस्लीम धर्मात ही पवित्र रमजान ईद म्हनुन साजरा करतात


जितेंद्र पेंदाम
पवनपार ता- सिंदेवाही ,जिल्हा- चंद्रपुर
चंद्र हा ग्रह ता-या पैकी एक असला तरी चंद्रकलेच्या कोरीचे महत्व अनेक धर्म गुरू,धर्म संस्थापक ,ज्योतिष्य जानतात.
ग्रह ता-यांचा मानवी जिवनावर परीनाम पडत असल्याचे अनेक जानकार सांगतात.
तसे पुर्वीच्या धर्म ग्रंथात चंद्रकलेच्या कोरीचे महत्व वर्णन केले असल्याचे बघायला मिळते.
विशेषत: शुक्ल पक्षातील चंद्रकलेच्या कोरीचे महत्व जास्त आहे.
गुडीपाडवा शुक्ल पक्षातील, अक्षय तृतीया शुक्ल पक्षातील, नागपंचमी शुक्ल पक्षातील, हरीतालीका तृतीया(गौरी) शुक्ल पक्षातील,गनेश चतुर्थी शुक्ल पक्षातील, नवरात्र उत्सव शुक्ल पक्षातील, भऊबिज शुक्ल पक्षातील ख्रिसमस नाताळ शुक्ल पक्षातील यासारखे विविध महीन्यातील विविध सन उत्सव विविध धार्मिक लोक साजरे करतात.
विविध धर्मातील लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करीत असले तरी मुळ उद्धेश एकच आहे ते म्हणजे आपापली परंपरा जपनं. आपल्या धर्मातील ,आपल्या समाजातील लोकांना एकत्रीत करनं, आपल्या धर्मामध्ये ,आपापल्या समाजातील लोकांमध्ये एकोपा,संघटन ,मैत्री ,प्रेम भावना जागृत करनं.
असं असलं तरी चंद्रकलेच्या कोरीचे महत्व वेगळेच आहे.
शुक्ल पक्षातील चंद्रकलेच्या कोरीचे आपल्या चंद्र स्वरावर शुक्ल पक्षातील द्वितीयेच्या चंद्राची कोर पाहीली तर मह्नीनाभर क्लेश व दु:खे होनार नाही तसेच वर्षाच्या संवत्सराच्या सुरूवातीला चंद्रस्वरावर शुक्ल पक्षातील चंद्रकलेच्या कोर पाहीली तर सर्व वर्ष सुख समृद्धीत जाइल असा उलेख जुन्या ग्रंथात पाहायला मिळत आहे.
रमजान ईद ही शुक्ल पक्षातील सन . हा महीना म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना.
आपल्या समाज बांधवासाठी , एकमेकाच्या समृद्धी साठी, एकमेकाच्या मैत्री साठी ,प्रेम भावना साठी ईश्वराकडे प्रार्थना करतात.
कोरोना चे संकटात आज ते एकत्र येत नसले तरी अंतकरनातल्या धाग्यांनी ,विचारांनी एकमेकासाठी ते बांधलेलेच आहेत .आपल्या समाजासाठी किंबहुना आपल्या भारत देशासाठी रमजान ईदच्या पवित्र्य महिन्यात भारत एकसंघ राहावं ,भारत सुख समृद्ध व्हावं म्हनुन अल्ला कडे प्रार्थना करतात.
आपलेही सन उत्सव शुक्ल पक्षातच येतात तेव्हा आपनही सन,उत्सव साजरे करतो . रमजान ईद ही आपलाच उत्सव समजुन , मुस्लिम बांधवायच्या या मैत्री पुर्ण ,प्रेमभावना उत्सवाला हार्दीक शुभकामना देवू या.
भारत एकसंघ राहावं ,भारता मध्ये प्रेंम भावना जागृत ,भारत आलेल्या कोरोना संकटावर मात करावं.
यासोबतच रमजान ईदच्या सर्व बांधवाना हार्दीक शुभेच्छा देवू या.
रमजान ईदच्या निमित्यानं " या भारतात बंधु भाव नित्य वसु दे ,दे वरची असा दे "(तुकडोजी महाराज)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!