डाॕ. राजपुरोहित होमिओपॕथी हेल्थ क्लिनिक तर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी होमिओपॕथी Arsenic Album औषध 3050 वाटप
डाॕ. राजपुरोहित होमिओपॕथी हेल्थ क्लिनिक तर्फे चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांसाठी होमिओपॕथी औषध तयार करुन देण्याची निःशुल्क सेवा दिल्या गेली.
आज शुक्रवार दिनांक 15.05.2020 ला जागतिक कुटुंब दिनाच्या औचित्याने डाॕ. राजपुरोहित होमिओपॕथी हेल्थ क्लिनिक, चंद्रपुर कडून संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी (3050 परिवार) होमिओपॕथी चे औषध तयार करुन देण्यात आले.
आयुष मंत्रालयातील संशोधन परिषदेने होमिओपॕथी औषधांद्वारे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जी मार्गदर्शक तत्वे मिळाली त्या व होमिओपॕथी चे जनक डाॕ. सॕमुअल हॕनीमन यांचे साथीच्या रोगावरील मार्गदर्शक तत्वे या दोन्ही अनुषंगाने Arsenic Album हे औषध 3050 बाॕटल्स मधे तयार करुन सर्व बाॕटल्स माननिय जिल्हा पोलीस अधिक्षक डाॕ. श्री महेश्वर रेड्डी सर तथा माननिय डी. वाय. एस. पी. श्री शेखर देशमुख सर यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या.
ही सर्व औषधी प्रत्येक डिवीजन मार्फत प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यां पर्यंत लवकरच पोचवली जात आहे.
या औषधाचे सेवन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक, औषध वाॕटर पोटेन्सी/डोजेस मधे घेण्या संदर्भात मार्गदर्शन, तसेच वाॕटर पोटेन्सी चे महत्त्व, व कोणत्या वयोगटाने कसे घ्यावे, कोणत्या व्यक्तीने घ्यावे अथवा घेवू नये, या बाबत संपुर्ण मार्गदर्शन देण्यात आले. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यां ला हे औषध वाॕटर डोजेस मधे घेण्याची योग्य पद्धत सहज लक्ष्यात यावी या करिता या प्रात्यक्षिकाचे एक विडीओ तयार करुन सर्वांपर्यंत पोचविण्यात आले.
माननिय डी. वाय. एस. पी. श्री शेखर देशमुख सर यांनी सेवेची ही संधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांना खुप खुप धन्यवाद.
यावेळी पोलिस दलातील पी. आय. मडामे सर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यासाठी पोलीस कर्मचारी तथा विद्यार्थी कोमेश्वर कापगते व समाप्त भसारकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी व माझे सहयोगीना या कार्यास बेशर्त मदत केल्या बद्द्ल धन्यवाद
डाॕ. गोपाल प्रभाकर राजपुरोहितश्री श्री टाॕवर्स, जैन भवन व मा. आमदार श्री किशोर जी जोरगेवार यांच्या आॕफीस च्या बाजुला, पठाणपुरा रोड, चंद्रपुर9422136849.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!