कालनिर्णयसह इतरही कॅलेंडर मधुन रोहीनी नक्षत्र हद्दपार #kalnirnay
कालनिर्णय व इतरही कॅलेंडर मधुन रोहीनी नक्षत्र हद्दपार
जितेंद्र पेंदाम (सिंदेवाही ता. प्रतीनिधी ग्रा.)
कालनिर्णय व इतरही कॉंलेंडर मधुन रोहीनी नक्षत्र हद्दपार झालेला असल्याचे शेतकर्यांच्यादृष्टीस पडत आहे.
पुर्वीचे शेतकरी जेव्हा दिनदरशीका घरोघरी नव्हत्या त्यावेळी शेतकरी पंचांग पाहत असायचे. परंतु आता घरोघरी कॉलेंडर आल्याने व तीथे ही बरीच माहीती असल्याने आता पंचागाचे महत्व कमी होत आहेत.
मे महिना लागला की शेतकर्यांचे लक्ष कॉलेंडर कडे जात असते.
मे महिन्याच्या शेवट शेवट शेतात जावुन शेती नांगरायला येईल का, पारे पेटवने, परे भरण्याची परेठन पेटवने ,शेतातील काडी कचरा काढने इ कामे करावी लागतात.
ही सर्व कामे रोहीनी नक्षत्रात किंवा मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच करतात.
त्यामुळे या महिन्यात लक्ष जाते कँलेंडर कडे . रोहीनी नक्षत्र हा इतर नक्षत्राचा पाया आहे.
रोहीनी नक्षत्रपासुनच इतर नक्षत्राची सुरूवात होते.
कधी कधी रोहीनी नक्षत्र मे महिन्याचा २४ ला किंवा मे महिन्याचा २५ तारखेला येत असते.
रोहीनी नक्षत्र लागताच पावसाळ्याला सुरूवात होते.
रोहीनी नक्षत्र काहीक दिनदरशीका मधुन हद्दपार झाल्याने रोहीनी नक्षत्र आहे की नाही असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. अनेक कॉलेंडर मधुन मे महिन्याची २४,२५ तारखेला रोहीनी नक्षत्र दिला गेला नाही.
डॉयरेक्ट मृग नक्षत्र दाखवला आहे. ग्रामिण भागातील शेतकरी रोहीनी नक्षत्रा ला महत्व देतात.
त्यामुळे रोहीनी नक्षत्र हद्दपार झाला की काय असा प्रश्न शेतकर्यांत होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!