अबब ! लाॅकडाऊनच्या काळात नेरी-चिमूर मार्गावर पकडली २० पेट्या विदेशी दारु तर ३० पेट्या भुर्र



राजूभाऊ हा कोन ?

ईनोव्हा कार सह आरोपी ताब्यात

चिमूर - तालूका प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि.२३ मे २०२० लाॅकडाऊन सुरू असताना,अवैध दारू व्यवसायीक वेगवेगळ्या युक्त्या उपयोगात आणून आपला अवैध दारू व्यवसाय कायद्याला न जुमानता करीत असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.काल दिनांक २३ में २०२० रोजी पोलीस स्टेशन चिमूर हद्दीत चिमुर पोलिस हे पेट्रोलिंग करीत,नेरी कडून चिमूर ला जात असताना एक इनोव्हा कार चा टायर फुटल्याने  कार क्र. MH15 EP 0252 या गाडीतील माल दुसऱ्या गाडीत भरने सुरू होते तेवड्यात नेरी पो.चौ.चे इंचार्ज किरण मेश्राम त्या ठिकाणी पोहचले व ३० पेट्या दारू तस्करांनी दुसऱ्या गाडी ने घेऊन निगुन गेले. अशी माहीती विलास डांगे यांनी वॉटसप ग्रुप द्वारे माहिती प्रकाशित केली आहे.पण कीरण मेश्राम काही दिवसा पासुन सुट्टीवर अाहेत व काल पण होते अशी चर्च होत अाहे.मंग तीथे कसे का पोहजले.हा शुध्दा जनतेत प्रश्न पडला आहे.

    त्यागाडीच्या झडती अंतर्गत पाहणी केली असता २० पेट्या ( ९६० निपा ) एकूण की. ६,८८,००० /- रु. चा मुद्देमाल व एक आरोपी  चिमुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पण तेथे दोन अारोपी होते मंग एकाला अटक व दुसऱ्या का सोडण्यात आले.त्या वेळी विलास डांगे हे तीथे उपस्थीत होते.ही त्यांच्या समोर घटनाचे दृष्य पुर्णपने स्वतः बगीतले आहे.अारोपी ने हा माल राजुभाऊ चा आहे.अशे सांगीत होते आणि त्याला फोन केले होते.त्या फोन ने किरण मेश्राम यांना अापन राजुभाऊ बरोबर बोलून घ्या पण पि.एस.आय.किरण मेश्राम यांनी सांगीतले कि धुळे साहेब येत आहे. लगेच स्वप्नील धुळे घटना स्थळी आले. या वर दोघा मध्ये चर्चा झाल्या.
       राजुभाऊ कोण आहे? या मुख्य आरोपीला अटक होणार का? नाही? हे चिमुर तालूक्यातील जनताला काही दिवसातच बगायला मिळेल.
       सदरची कारवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उप विभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे,पोउपनी किरण मेश्राम,पोहवा प्रवीण तिराणकर, विलास निमगडे,विलास सोनूले, नापोशी किशोर बोढे,पो.शी कैलास आलम,विनायक सरकुंडे, सचिन गजभिये,सतीश झिलपे , भरत गोडवे,कैलास वनकर यांनी पार पाडली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!