मेहा येथील सरपंच राजकारण करीत असल्याचा सदस्याचा आरोप

कोरोनाच्या संकटाच्या काळातही ग्रामपंचायत मेहा येथील सरपंच करीत आहेत राजकारणातून भेदभाव
प्रशांत मलोडे मेहा बुजरूक यांचा आरोप


सावली (प्रतिनिधी)
देशामध्ये कोरोनाचे संकट असून शासन प्रशासन तथा सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कोरोनाच्या संकटसमयी राजकीय तथा आपसी भेदभाव सोडून निःस्वार्थ पद्धतीने काम करीत आहेत व कोरोनाच्या संकटाच्या लढ्यात जनमाणसासोबत राहून कोरोनाला लढा देत आहेत. परराज्यातुन आलेल्या कामगार बांधवाना स्वगावी परत आणण्याचे काम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री महोदय मा. नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी स्वतः लक्ष देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. पररज्यातून आलेल्या कामगार बांधवाना स्वगावी परत आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन केल्या जात आहे व चंद्रपूर जिल्ह्या अंतर्गत आलेल्याना त्यांची वैद्यकीय तपासणी करून होम क्वारंटाईन केल्या जात आहे. तश्या सूचना सुद्धा वेळोवेळी कोरोनाच्या संधर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांचेकडून देण्यात येत आहे. परंतु सावली तालुक्यातील मेहा बुजरूक येथील सरपंच राजकीय विरोधापोटी अन्याय करीत असल्याचा आरोप मेहा येथील श्री प्रशांत मलोडे यांनी केला आहे. प्रशांत मलोडे यांची पत्नी मेहा बुजरूक येथून त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे गेल्या असता कोरोनाच्या संकटाच्या काळात देशामध्ये संचारबंदी तसेच सोशल डिस्टंसिन्गचे नियम कडक करण्यात आले त्यामुळे त्यांना मेहा येथे येण्यास अडचण निर्माण झाली असता ते काही दिवस तिथेच थांबले. नंतर चंद्र्पुर जिल्ह्यामध्ये थोडी शिथिलता लागू केल्यानंतर पत्नीला स्वगावी आणण्याकरिता मेहा येथील श्री प्रशांत मलोडे यांनी स्थानिक पटवारी पोलीस पाटील तथा ग्रामसेवक यांना तोंडी माहिती दिली असता त्यांनी आणावयास होकार देताच मे महिन्याचा 15 तारखेला जाऊन आणले. तिथून परत आणायच्या आधी चंदनखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तपासणी करून कोरोनाचे कोणतेही लक्षण नसल्याचे प्रमाणपत्र चंदनखेडा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिले तसेच चंदनखेडा येथील उपसरपंच यांनी सुद्धा प्रशांत मलोडे यांची पत्नी चंदनखेडा याच ठिकाणी होत्या अशे सुद्धा लिहून दिले. स्वगावी आल्यानंतर सुद्धा त्यांनी नियमानुसार अंतरंगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती देऊन परत त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले. परंतु राजकीय द्वेषापोटी मेहा बुजरूक येथील सरपंच यांनी लगेच दुसऱ्या दिवशी स्थानिक पदाधिकारी यांचेशी चर्चा करून परत त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन व्हावे लागेल अशी सूचना श्री प्रशांत मलोडे यांना केली. ज्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केल्या गेलेलेआहे तिथे बाहेर जिल्ह्यातून किवा परराज्यातून कामगार बांधव आलेले आहे ते सर्व रेड झोन मधून आलेले आहेत आणि त्या ठिकाणी माझ्या पत्नीला ठेवणे चुकीचे आहे. अशी विनंती करून सुद्धा हा सर्व प्रकार माझ्यावर राजकीय द्वेषातून झालेला आहे असा आरोप प्रशांत मलोडे यांनी मेहा बुजरूक येथील सरपंच यांचेवर केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!