मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तक्रार दाखल



नागपूर (प्रतिनिधी)
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांचे विरोधात आज दीपक मेहता यांनी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक आयोग मुख्यमंत्री आणि पोलिसात ही तक्रार दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
याबाबतचे वृत्त ही एका वृत्त वाहिन्यावर प्रकाशित झाले आहे.

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आर्थिक बाबीशी संबंधित खोटी माहिती दिल्याची तक्रार करण्यात आली आहे.  त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांचेवर केला आहे.
निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र आयकर विभागामार्फत तपासले जातात, त्यामुळे आपण याची तक्रार आयकर विभागाकडेही करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले. या तक्रारीची दखल न घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
बंद कंपनीच्या नावावर लोन घेतल्याची तक्रार आहे व त्यामध्ये गोंधळ आहे, असा आरोप केला जात आहे. 
प्रतिज्ञापत्रात निवडणुकीआधी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींची माहिती द्यायचे असते त्या मध्ये तुमच्या आर्थिक परिस्थिती बद्दल सुद्धा माहिती द्यायचे असते. तुमचे उत्पन्न, संपत्ती लिहायचे असते. उमेदवाराचा सर्व  क्राइम रेकॉर्ड सुद्धा यामध्ये घ्यायचा असतो आणि त्यामध्ये गोंधळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारकर्ता हा विजय वडेट्टीवार यांच्या व्यवसायात भागीदार असल्याचे कळते.

निवडणूक प्रतिज्ञापत्रात वडेट्टीवार यांनी शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून एक लाख 50 हजार रुपये स्वतःच्या आणि तीन कोटी 94 लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज घेतल्याचे दाखविले आहे. मात्र ही कंपनी जुलै 2018 लाच बंद पडली आहे.

दुसरीकडे पार्टनरशिप फर्म देवयानी लॉजिस्टिक याचा वडेट्टीवार यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला नाही. वरधान हॉस्पिटल नावाच्या कंपनीत त्यांनी एक कोटी 84 लाख 85 हजार रुपये गुंतवलेले आहे. पत्नीच्या नावाने 68 लाख गुंतवलेले असून त्याचाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला नाही. याची पोलीसांत तक्रार केली असल्याचे मेहता यांनी सांगितले.
मेहता ब्लॅकमेलर : वडेट्टीवार दीपक मेहता मला ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांना खोटी माहिती दिली असे वाटत असेल तर निवडणूक याचिका दाखल करावी.आपण त्यावर न्यायालयात उत्तर देऊ. मात्र आठ दिवसांपूर्वी तक्रारीची प्रत त्यांनी आपणास पाठविली तसेच प्रसिद्धी माध्यमांनाही पुरविली. यावरून त्यांचा हेतू काय आहे, हे स्पष्ट होते. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, त्यांचे कोणाशी संबंध आहेत? याची सर्व माहिती आपल्याकडे असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

1 टिप्पणी:

  1. हे सर्व भाऊची लोकप्रियता व जनसंपर्क पाहून वेडे झाले।फक्त बदनामी करण्यासाठी सर्व खटाटोप चालू आहे।भाऊ आप आगे बढो।जनता आपके साथ है

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!