गरजूंना मदत करून केली रमजान ईद साजरी

गरजूंना मदत करून केली रमजान ईद साजरी


मूल (सचिन वाकडे)
मुस्लीम बांधव तथा हजरत टिपू सुलतान फाउंडेशनच्या वतीने आज पवित्र रमजान ईदनिमित्य तालुक्यातील गरीब व गरजू दोनशे व्यक्तींना सोशल डिस्तेन्सिंगचे नियम पाळत जामा मस्जिद जवळ अन्नधान्य सामान सेनीटायझर, मास्क व मिठाई वाटप करून सामाजिक दायित्व जोपासत ईद साजरी करण्यात आली.
देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे कुटुंबासाठी कसलीही खरेदी न करता तोच पैसा गरजू व्यक्तींसाठी कामी लावण्याच्या संकल्प करून तो प्रत्यक्षात आणला.


देशात सुख, शांती, समृद्धी येवून कोरोनाची समाप्ती होवो. देश लवकरात लवकर सुरळीत मार्गावर येवो अश्या सदिच्छा करीत समस्त रमजान महिन्यात सर्व मुस्लीम बांधव आपल्याच घरी नमाज पठन करून अल्लाह कडे प्रार्थना केली.
हा सामाजिक उपक्रम पार पडण्यासाठी जामा मस्जिद मुलचे इमाम हजरत शमशेर रजा, अब्दुल शकूर, कादर शेख, तौसिफ सय्यद, अन्वर शेख, इजाज दलाल, शानू शेख, अहमद दलाल, पप्पु शेख यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!