सावरगांव रोडवर चारचाकी पलटी होऊन एक जागीच ठार तर दोघे जखमी



पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमुर तालुक्यातील नेरी जवळील नेरी सावरगाव रोड वर दर्गा समोर कार पलटी होऊन सुशील महेंद्र लोखंडे वय ३१ वर्ष या व्यक्ति चा  जागीच मृत्यू झाला . हि घटना दि.२४ मे २०२० रोज रविवारला दुपारच्या सुमारास घडली.हे तीघे जन मित्राच्या लग्नाला गेले होते . लग्नावरून परत येत असतानी सावरगांव - नेरी रोडवर नेरीच्या दर्ग्यासमोर चारचाकी सेंन्ट्रो कंपनीची चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी चार वेळा पलटी होउन शेतात गेली . यामध्ये एकाचा जागीच म्रुत्यु तर दोघे किरकोळ जखमी आहेत . किरकोड जख्मी मध्ये दामु डांगे हा घरी आला असून ड्रायव्हर परवेज घटनास्थळावरून फरार झाला आहे.कार मध्ये तीन व्यक्ती असून त्या पैकी दामु फताराम डांगे वय ५५ वर्ष  परवेज अजानी वय  ३० वर्ष  हे दोघे  किरकोळ जखमी आहेत . तर सुशील लोखंडे हा युवक जागीच ठार झाला. गाडी नंबर एम. एच.३१ , सी.एन.१५५०  हा आहे .
  त्या म्रुत्यु झालेल्या सुशील लोखंडेला  चिमूर उपजील्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . या घटनेचा तपास चिमुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेशजी मोहोड हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!