चंद्रपुरात आणखीन दोन नवे रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 21
चंद्रपूर (प्रतिनिधी)
चंद्रपूर येथे कोणाचे संकट कायम असून आणखी दोन नव्या रूग्णाची आज भर पडली. आता चंद्रपूर जिल्ह्यात करोणा बाधीतांची संख्या 21 झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा 2 नवीन रुग्ण आढळले, रुग्णसंख्या 21 झाली.
बालाजी वॉर्ड, चंद्रपूर आणि विसापूर येथील हे रूग्ण आहेत.
चंद्रपूर कोरोना अपडेट
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २१ झाली आहे रविवारी सायंकाळी आणखी दोन रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजीच्या रात्री दिडच्या सुमारास चार अहवाल पॉझिटिव्ह आले होते .त्यामुळे २४ मे रोजी सकाळी १९ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळी २१ झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 मे रोजी सायंकाळी आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हे दोन्ही रुग्ण दाखल आहेत.
नव्याने पॉझिटिव ठरलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहे
१. चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरातील एक 24 वर्षीय युवक 11 मे रोजी पुण्यावरून आल्यानंतर होम कॉरेन्टाइन झाला होता. लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल झाला. 22 मे रोजी त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.
२. दुसरा रुग्ण यापूर्वी विसापूर येथील पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णाची आई आहे. ती देखील सध्या चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल आहे. 22 तारखेला या 45 वर्षीय महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते.
हे दोन नवीन रुग्ण आज 24 मे रोजी पॉझिटिव्ह ठरल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 झाली आहे.
चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २१ झाले आहेत.



चंद्रपुरातील दोन मेडिकल कॉम्प्लेक्स मध्ये बरेच कस्टमर औषधी घेण्यासाठी येतात. योग्य त्या नियम आणि वेळ ठरवून द्यावी. खबरदारी न घेतल्यास कोरोना बिमारी वाढू शकते. धन्यवाद. ही फक्त सूचना.
उत्तर द्याहटवा