कोरोना आपत्तीवर जाणीवपूर्वक मात करीत चिमूर चे पोलीस निरीक्षक ठरले मजुरांचे कैवारी



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दि.२७/०५/२०२० आज संपूर्ण विश्वात कोरोना कोविड - १९ या वायरस ची महामारी सुरु असून महाराष्ट्रात २२ मार्च २०२० पासून संचारबंदी व लॉक डाऊन तसेच कलम १४४ चे कठोर आदेशाची सुरुवात झाली असतांना ग्रीन , ऑरेंज , रेड अशा प्रकारची ३ झोन सरकारने पडली त्यात प्रथम  ग्रीन झोन मध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नाही , द्वितीय ऑरेंज झोन मध्ये एका पेक्षा अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर ,तृतीय रेड झोन अधिकाधिक संख्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल त्यास रेड म्हणजेच डेंजर झोन असे नाव देण्यात आले आहे.


 हे बघत असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिमूर शहरातील पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे  यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी पोलीस पथक यांच्या सोबत सोशल डिस्टन्स चे पालन करीत पर राज्यातील मजुरांना पायदळ वारी करीत असतांना बघून चिमूर चे पोलीस निरीक्षक यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू ढळू लागले असता कायद्याच्या चाकोरीत बसून नियमानुसार संपूर्ण पडताळणी करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना अन्न पुरवठा करून रितसर खाजगी ट्रॅव्हल्स , मिनी ट्रॅव्हल , व छोट्या चार चाकी वाहनाने सोशल डिस्टन्स लक्षात घेऊन त्यांची स्वारी काढण्यात आली .

हि स्वारी चंद्रपूर जिल्ह्यातील हद्दीपर्यन्त सोडण्यात आली. अशाप्रकारे सेवा देत सरकारने २ महिने उलटल्यानंतर सरकारने क्षीथिलता बाळगत रितसर परवानगी देत पायदळ चालत येणाऱ्या मजुरांची गैरसोय न करता त्यांच्या तहान - भूखेची जाणीव करीत आरोग्याची काळजी घेत ई - पास तयार करून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या स्वगावी खाजगी ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून सोडण्यात आले.
यात चिमूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांनी २४ तास सेवा देत शासकीय नियमांचे पालन करून सेवा दिली.याबाबत संपूर्ण चिमूर तालुक्यातील जनतेणे इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून  , व्हॉट्सअप , फेसबुक , ट्विटर , व  व्हॉट्सअप स्टेटस च्या माध्यमातून आभार मानले या उपक्रमात सहभागी चिमूर तहसील चे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनीही दिवस रात्रीची व जीवाची परवा न करता जनतेच्या हितार्थ सेवा प्रदान केली त्याबद्दल सुध्दा शासकीय कर्मचारी तथा जनतेने सुद्धा आभार व्यक्त केले.

 व चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी सुध्दा स्व खर्चाच्या माध्यमातून चिमूर विधानसभा क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची किट , हँड सॅनिटायझर , व अन्न शिजवून गरजवंत तसेच विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना
भोजन वाटप सुध्दा या आपत्तीजनक परिस्थितीत वाटप करण्यात आले. आणि कोरोना या आपत्तीवर अजूनही काही प्रमाणात क्षीथिलता असून सेवा देण्याचे कार्य सुरू असून जनतेनी सोशल डिस्टन्स चे पालन करणे आवश्यक आहे व अत्यावश्यक कामे असल्यानंतरच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर विनाकारण फिरू नये या आपत्तीवर विजय मिळविण्यासाठी संदेश जाहीर केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!