पोलिसांनी वाचवले बाप-लेकीचे प्राण !
पोलिसांनी वाचवले बाप-लेकीचे प्राण !
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
येथील वार्ड नंबर 5 मध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराजवळील सार्वजनिक विहिरीजवळ प्रभाकर बारेकर वय 27 व त्याची अडीच वर्षाची मुलगी शिवन्या बारेकर हे दोघे खेळत असताना अचानक प्रभाकरचा पाय घसरून दोघेही विहिरीत पडले पोलीस कर्मचारी यांनी त्यांना बाहेर काढून दोघांचे ही प्राण वाचविल्याची सुखद घटना शंकरपूर येथे घडली
शंकरपूर पोलीस चौकी चे कर्मचारी रात्री गस्त घालत होतें वॉर्ड न 5 च्या सार्वजनिक विहिरी वर गर्दी जमली होती त्यामुळे त्यांनी तात्काळ चौकशी केली असता दोघे जण विहिरीत पडल्याची माहिती मिळाली त्यामुळे तेथे उपस्थित पोलीस शिपाई परमेश्वर नागरगोचे यांनी 40 फूट विहिरीत उडी मारून बाप लेकिना सुखरूप बाहेर काढून त्या दोघांनाही शंकरपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले असून दोघांची प्रकृती धोक्या बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून कसलाही वेळ वाया न जाऊ देता त्या बाप लेकीचं प्राण वाचविण्यात यश आले आहे.
शंकरपूर चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जांभळे, पो. हे. काँ. खोब्रागडे, पोलीस शिपाई नागरगोजे यांनी केलेल्या धाडसामुळे बाप-लेकीचे प्राण वाचले त्यामुळे नागरिकाकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!