अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो वृक्षांची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो वृक्षांची
चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
सिंदेवाही (जितेंद्र पेंदाम)
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधील गुंजेवाही तलाठी सांजा १९ अंतर्गत येत असलेल्या खैरी(चक) मध्ये शासनाच्या अटी शर्ती चा उल्लंघन करून तलाठी कार्यालयात अतिक्रमण पंजीवर नोंद नसताना देखील दलालांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतीच्या नावाखाली अतीक्रमण करून हजारो वृक्षांची कत्तल करून शेकडो एकर घनदाट जंगलातील वृक्षतोडून लगेच त्या झाडांना जाळण्याचा सपाटा सुरू केला आहे.त्यावर महसूल विभाग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती असुनही.तेच वरदान ठरत असल्याने या प्रकरणाकडे पुर्णत: दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची दखल घेऊन चौकशी करीत नाही.ही बाब अत्यंत गंभीर असून खेदजनक आहे. याबाबत ग्रामपंचायत मरेगाव यांनी सन २०१४ मध्ये ठराव घेऊन शासन प्रशासनाकडे पुराव्यानीशी लेखी तक्रार दाखल केली.शासनाने चौकशी प्रस्थापीत केली.पंरतु संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे पुर्णत: कानाडोळा करुन दुर्लक्ष करीत थातुरमातुर चौकशी करून दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.फक्त एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.ही गंभीर बाब असताना महसूल विभाग व वन विभागाचे अधिकारी मोक्का चौकशी करून त्या दोषींवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नसल्याने त्या अधिकाऱ्यां वरच प्रश्र्न चिन्ह उपस्थीत होत आहे.ती संपूर्ण जागा ताब्यात घेऊन शासन स्तरावरुन वनीकरणाच्या माध्यमातून रोपवन करण्यात यावे.अशी ही मागणी करण्यात येत आहे.तरी महसूल विभागाने तात्काळ खैरी(चक),खैरी(गोलकर)या गटाचे कागदपत्रे ताब्यात घेऊन त्या गटामधील अतिक्रमण धारकांची सखोल चौकशी करावी. चौकशी अंती वृक्षतोड करणाऱ्या दोषीवंर दंडात्मक व हेराफेरी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन शासन प्रशासनात पारदर्शकता निर्माण करावी.अशी मागणी गुंजेवाही परीसरातील जनतेनी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!