जिल्हा व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरूच प्रशासनाचे मदतीचे आवाहन



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चंद्रपूर दि. 13 मे 2020 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  जिल्हा सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार  यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. आजपर्यंत 71 लक्ष रुपयांचा निधी जिल्हाधिकारी सहाय्यता निधीसाठी उपलब्ध झाला आहे.

आज प्रामुख्याने जिल्हा सहायता निधीमध्ये आनंदी महिला बचत गट हनुमान नगर तुकुम,चंद्रपूरच्या वतीने रु.10 हजार, राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था चिमूरच्या वतीने रु.11 हजाराचा धनादेश देण्यात आला.

त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविंड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये दिनकर दादाजी सिधमशेट्टीवार चंद्रपूर यांच्याकडून रु.25 हजार तर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था, चंद्रपूरचे जिल्हा संघटक यशवंत हजारे यांच्या मार्गदर्शनात लोकसहभागातून रु.2 हजार 500 रुपयाचा धनाकर्ष सहायता निधीस देण्यात आला.

कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक  960310210000048  असून यासाठी आयएफएससी कोड  BKIDOOO9603  असा आहे.

कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. यासाठी आयएफएससी  कोड SBIN0000300  असा आहे.

जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!