अतिरीक्त जिल्हा होणे हा मूळ मागणीला बगल देण्याचा प्रकार



मागणी चिमूर जिल्ह्याची, मिळाले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - नुकतेच चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाल्याची बातमी धडकली. या बातमीतून चिमूरकर यांना आनंद होण्यापेक्षा संभ्रमावस्था कायम झाली आहे.
         सन १९८१ पासून स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. दामोधर लक्ष्मण काळे गुरुजी यांनी चिमूर जिल्हा करण्यात यावा, ही मागणी सर्वप्रथम केली. या मागणीला जनतेचा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद मिळाला.यातून चिमूर जिल्हा व्हावा याकरिता चिमूर परिसरातील अबालवृद्धासह युवक इत्यादी सक्रिय झाले होते.
चिमूर जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणी करीता दिनांक ५ जानेवारी २००२ रोजी सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता. त्यात संतप्त मोर्चेकरू जनतेनी तहसील कार्यालय चिमूर च्या इमारतीची जाळपोळ केलेली होती. जाळपोळ हे कृत्य समर्थनीय नसले तरी यातून जनतेच्या भावना जिल्ह्याच्या प्रती किती तीव्र आहेत हे सिद्ध झाले होते.
         चिमूर जिल्हा करण्याचे सोडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले.अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणे म्हणजे चिमूर जिल्हा मागणीला बगल देण्याचा प्रकार असल्याची खमंग चर्चा चिमूरकरात सुरू आहे.
         चिमूर नगर परिषद होण्याचे पूर्वी नगर पंचायत घोषित झाली होती तेव्हा चिमुरकरानी नगर पंचायत नको नगर परिषद हवी असे आंदोलन केले होते या आंदोलनाची फलश्रुती म्हणून आज चिमूर नगर परिषद झाली आहे.चिमूर जिल्हा ही मूळ मागणी शासन व        प्रशासनाकडे सोडून  अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करणे हे किती संयुक्तिक आहे हा अत्यंत चिंतनाचा विषय ठरला आहे.
         चिमूर जिल्हा झाल्यास महसूल कामासह कृषी, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, परिवहन कार्यालय जिल्हा ग्रंथालय, पोलीस  मुख्यालय, आदि विविध कार्यालय कार्यरत होतील. यातून सामान्य जनतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अन् अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यास यात फक्त महसूल प्रकरणे निकाली निघतील मात्र अन्य कामे करण्याकरिता चंद्रपूरलाच जावे लागेल.करीता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होण्यापेक्षा पुर्णतः चिमूर जिल्हा घोषीत व्हावा असा एक विचारप्रवाह चिमूरात सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!